जळगाव : प्लॉट बिनशेती करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणा-या भुसावळ प्रातांधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचे वृत्त आहे. दरम्यान या वृत्ताने भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे. प्रतिभा मच्छिंद्र लोहार असे एसीबीच्या सापळ्यात अडकलेल्या महिला अव्वल कारकुनाचे नाव आहे.
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुसावळ शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरु होते. अधिक माहितीनुसार नंदुरबार एसीबीचे पथक 17 सप्टेबर रोजी पडताळणीसाठी आले होते. कारवाईची कुणकुण लागल्यामुळे प्रतिभा लोहार यांनी लाचेची रक्कम घेतली नाही. मात्र लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या पथकाने केली.