पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

On: October 8, 2021 6:48 AM

सोलापूर : सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. या खात्यावरुन पैशांची मागणी करण्यात आल्याचे देखील उघड झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सदर फेसबुक अकाऊंट तातडीने ब्लॉक करुन डिलीट करण्यात आले.

पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नावासह फोटोचा वापर करत कुणीतरी त्यांचा फेसबुक आयडी हॅक केला. या आयडीच्या माध्यमातून पैशांची मागणी करण्यात आल्याचे उघड झाल्यानंतर सातपुते यांनी त्यावर हे फेक अकाऊंट असून कारवाई करण्याचा इशारा वजा मेसेज दिला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment