डीसीपी सुजाता पाटील यांच्यावर एसीबीची टाच!- चाळीस हजार रुपयांच्या मोहात स्विकारली लाच!!

On: October 8, 2021 6:14 PM

मुंबई : एक लाखापैकी चाळीस हजाराच्या लाचेचा हप्ता घेतांना मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

डिसीपी सुजाता पाटील यांच्याकडे सध्या मेघवाडीसह जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज आहे. सुजाता पाटील यांनी तक्रारदाराकडून एका प्रकरणाच्या कामासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. या लाचेच्या रकमेचा पहिला चाळीस हजार रुपयांचा हप्ता घेत असतांनाच दबा धरुन बसलेल्या एसीबीच्या अधिका-यांनी त्यांना रंगेहाथ अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment