सोलापूर व पुणे पोलिस दलात खांदेपालट

On: October 8, 2021 9:45 PM

मुंबई : राज्याच्या गृह विभागाने आज सोलापूर व पुणे येथे वरिष्ठ पातळीवरील दोघा पोलिस अधिका-यांच्या बदल्या केला आहेत. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे तसेच पोलिस उप महानिरीक्षक हरिष बैजल या दोघा बड्या पोलिस अधिका-यांचा त्यात समावेश आहे.

पोलिस उप महानिरीक्षक हरीश बैजल यांची सायबर व म.अ.प्र., महाराष्ट्र राज्य, मुंबई येथून सोलापुर शहर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांची ठाणे शहर येथे असलेली आदेशाधीन बदली रद्द करण्यात आली असून त्यांची नियुक्ती पुणे पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत झाली आहे.
अप्पर आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, ठाणे शहर अनिल कुंभारे यांची ऑगस्ट महिन्यात नागपुर येथे बदली करण्यात आली होती. ती बदली रद्द करण्यात आली आहे. सोलापूर शहरचे अप्पर पोलिस आयुक्त दत्ता कराळे यांचीं ऑगस्ट महिन्यात पोलिस आयुक्त (सोलापूर शहर) म्हणून करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment