जळगाव : जळगाव येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नशिराबाद येथे उद्या रविवार दि. 10 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तेथील जि प प्राथमिक शाळा क्र. एक येथे सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शिबिरात आढळून आलेल्या रुग्णांच्या व महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना अंतर्गत उपलब्ध असलेल्या आजारांवर देवकर हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार केले जाणार आहेत.
या शिबिरात डायबिटीस, ब्लड प्रेशर, थायराॅइड, लहान मुलांचे आजार, महिलांचे गर्भपिशवीचे आजार व मासिक पाळी संबंधीच्या समस्या, महिलांच्या स्तनाचे आजार, मानेचे व मणक्याचे आजार, पोटाचे आजार, मुळव्याध व भगंदर, आतड्यांचे आजार, अशक्तपणा व चक्कर येणारे आजार, डोळ्यांच्या लालसरपणाचे आजार, नजर कमी होणे, डोळ्यातून पाणी गळणे, डोळ्यांचे इतर आजार व मोतीबिंदू, हिरड्यांचे आजार, स्नायुंचे दुखणे, गुडघे व सांधेदुखी, रक्ताचे आजार याची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.
शिबिरात तपासणी करणाऱ्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममध्ये डॉ. प्रशांत साठे (न्यूरोसर्जन), डॉ. नीरज चौधरी (युरो सर्जन), डॉ. शुभा महाजन (त्वचारोग तज्, डॉ. मनोज पाटील (न्यूरोसर्जन), डॉ. अनुश्री व्ही (एमडी फिजिशियन), डॉ. रेणुका चव्हाण (नेत्ररोग तज्ञ), डॉ. सचिन इंगळे (कॅन्सर सर्जन), डॉ. शाहिद खान (स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ञ), डॉ. मंजू पवार (नेत्ररोग तज्ञ), डॉ. अमित भंगाळे (किडनी विकार तज्ञ), डॉ. वैभव गिरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. अश्विन चव्हाण (दंतरोग तज्ञ), डॉ. श्रीराज महाजन (प्लास्टिक सर्जन), डॉ. निरंजन चव्हाण (सांधेरोपण तज्ञ), डॉ. तेजस पाटील (अस्थिरोग तज्ञ), डॉ. डॉ. प्रियंका चौधरी (स्त्री रोग तज्ञ), डॉ. समीर चौधरी (जनरल सर्जन), डॉ अमित नेमाडे (फिजिओथेरपिस्ट), डॉ. अनंत पाटील (एमडी आयुर्वेद) यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी मो. क्र. 9422977071 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.