जळगाव : जामनेर पोलीस स्टेशन हद्दीत सुप्रीम पाईप कंपनी परिसरात हिंगणे गावाकडे जाणा-या रस्त्यालगत शेतातील विहीरीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
सदर इसमास गळफास दिला असल्याचे दिसून येत आहे. सुमारे 25 ते 30 वयोगटातील मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन जामनेर पोलिस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे. मृतदेहाच्या अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅंट आहे.
कुणाचा नातेवाईक, मित्र घरातून निघून गेला असेल अथवा कुठे अशा वर्णनाची मिसींग दाखल असल्यास जामनेर पोलिस स्टेशनशी 02580 230033 या क्रमांकावर अथवा पोलीस निरीक्षक किरण शिंदे 8329008302, पो.कॉ. तुषार पाटील 9158119110, पो.कॉ. निलेश घुगे 8007333193, पोलिस नाईक 9423488863 यांचेशी कृपया संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.