जळगाव : जळगाव शहरातील एमआयडीसी हद्दीतील अयोध्या नगर – रौनक कॉलनी भागात घरफोडीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सोन्याचे दागिने व रोख 75 हजार रुपये रोख असा एकुण 1 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेंद्र ओमप्रकाश दुबे हे व्यावसायीक रौनक कॉलनी भागात राहतात. वाघ नगर भागात त्यांची सासरवाडी आहे. त्यांच्या सासूचे निधन झाल्यामुळे त्यांची पत्नी व मुले वाघ नगर येथे गेले होते. सासुच्या अस्थी विसर्जनासाठी नरेंद्र दुबे नाशिक येथे गेले होते. त्यामुळे रौनक कॉलनी येथील त्यांचे घर बंद होते.
बंद घराचा फायदा उचलत चोरट्यांनी रात्रीच त्याच्या घराचे कुलुप तोडून आत प्रवेश मिळवला. त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम 75 हजार असे एकुण 1 लाख 70 हजाराचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. आज सकाळी नरेंद्र दुबे यांच्या पत्नी दुर्गादेवीची ज्योत लावण्यासाठी सकाळी घरी गेल्या. त्यावेळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी हा प्रकार पती नरेंद्र दुबे यांना कळवला. त्यामुळे आज दुपारी नरेंद्र दुबे तातडीने जळगावला परत आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.