दुचाकी चोरटे एमआयडीसी पोलिसांच्या तावडीत

On: October 14, 2021 4:15 PM

जळगाव : अभिषेक उर्फ निक्की नंदलाल मिश्रा व निखील जितेंद्र ठाकरे या दोघा मोटार सायकल चोरट्यांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. अटकेतील दोघा चोरट्यांवर एमआयडीसी, फैजपूर व चोपडा येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल मोटार सायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ज्ञानेश्वर शिवाजी पाटील यांची मोटार सायकल 8 सप्टेबर रोजी सिद्धीविनायक हॉस्पीटल येथून चोरी गेली होती. मनोज ज्ञानचंद कुकरेजा यांची मोटार सायकल 14 सप्टेबर रोजी सिंधी कॉलनी सेवा मंडल मंदीर येथून चोरीला गेली होती. सदर दोन्ही मोटार सायकल चोरीचे गुन्हे एमआयडीसी पोलिसात दाखल करण्यात आले होते.

दोघे चोरटे चोरीच्या मोटार सायकली भुसावळ शहरात विक्री करत असल्याची माहिती पो.नि. प्रताप शिकारे यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे, योगेश बारी यांना भुसावळ येथे रवाना करण्यात आले. चोरीच्या मोटार सायकल भुसावळ शहरात विक्री करण्यापुर्वीच त्यांना पोलिस पथकाने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून मोटार सायकल चोरीचे अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment