जळगाव : गावठी बनावटीचा कट्टा व चाकूच्या धाकावर नशिराबाद येथे दहशत माजवणा-या इसमास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मो.हाशीम मो.सलीन खान (41) रा.प्रल्हाद नगर, रिंग रोड, 15 बंगला जवळ, भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून लोखंडी गावठी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतूस व धारदार चाकू अशी हत्यारे विनापास विना परमिट बेकायदा आढळून आली. त्याच्या विरुद्ध नशिराबाद पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेतील आरोपी मो.हाशीम यास पुढील तपासकामी नशिराबाद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या विरुद्ध यापुर्वी भुसावळ बाजारपेठ, भुसावळ शहर आदी पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हे दाखल आहेत.
पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ. संदिप रमेश पाटील, पोलिस नाईक प्रविण जनार्दन मांडोळे, पोना परेश प्रकाश महाजन व रविंद्र रमेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.