दारुला पैसे दिले नाही म्हणून वृद्धाची हत्या

On: October 20, 2021 8:31 AM

अहमदनगर : श्रीगोंदे शहरातील बापू विष्णू ओहळ (70) या वृद्धाचा दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून नामदेव सुनिल भोसले रा. मांडगवण (40) या इसमाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने झालेल्या वादात बापू ओहळ यांची नाका तोंडावर ठोसे मारुन हत्या करण्यात आली. हत्येनंतर लेंडी नाल्याजवळ असलेल्या झाडाझुडूपात त्यांच्या मृतदेह टाकून देत संशयीत फरार झाला होता.

याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस स्टेशनला सुनील भागचंद घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नामदेव सुनिल भोसले याच्या विरुद्ध खुनाच गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी झालेल्या वादात सुनिल तात्याराव ससाने हा जखमी झाला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिलीप तेजनकर पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment