मारहाण प्रकरणातील तरुणास अटक

On: October 20, 2021 6:20 PM

जळगाव : दोन वर्षापुर्वी झालेल्या जुन्या वादातून चौघा जणांनी प्रशांत चौधरी या तरुणास 16 ऑक्टोबर रोजी मारहाण केली होती. याप्रकरणी अमन चंद्रकांत सोनवणे, सुनिल राठोड, अनिल राठोड, रोहित भालेराव अशा चौघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

या घटनेतील अमन चंद्रकांत सोनवणे यास अटक करण्यात आली. अटकेतील अमन चौधरी यास न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अमन सोनवणे यास दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, सुनिल सोनार, प्रदीप पाटील, साईनाथ मुंडे यांनी त्याला अटक केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment