क्वारंटाईन सेंटर मधील रुग्णाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

On: July 21, 2020 12:47 PM

जळगाव: पाचोरा येथील कोरोना संशयित रुग्णाने मध्यरात्री गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे.या घटनेने पाचोरा शहरासह तालुक्यात खळबळ माजली आहे.

पाचोरा शहरातील जामनेर रोड वरील साई मोक्ष क्वारंटाईन सेंटरमध्ये 19 जुलै रोजी 33 वर्षांचा तरुण दाखल झाला होता. मध्यरात्री त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. 20 जुलै रोजी त्याचे स्वब घेण्यात आले होते.

त्याचा अहवाल येण्यापूर्वीच त्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले. तरुणाने केलेल्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळावर आज सकाळी साडेतीनच्या सुमारास पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील , तहसीलदार कैलास सावळे , पोलीस निरीक्षक अनिल शिंदे , डॉ. अमित साळुंखे यांनी भेट देत पाहणी केली .

मृत तरुणावर शासकीय नियमाप्रमाणे प्रोटोकॉल नुसार अंतिम संस्कार करण्याची तयारी करण्यात आली. दरम्यान तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण समजलेले नाही.

कोविड रुग्णालयातील रुग्णांचे समुपदेशन वेळोवेळी करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पस्ट होत आहे. या आत्महत्येबाबत चौकशी होण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment