अट्टल मोटार सायकल चोरटा अटक

On: October 21, 2021 8:43 PM

जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महेश भोरसे रा. हनुमंतसिम ता. एरंडोल असे अटकेतील मोटार सायकल चोरट्याचे नाव आहे. त्याच्या कब्जातून चोरीची एक मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे. सावदा पोलिस स्टेशनचा मोटार सायकल चोरीचा गुन्हा त्याच्या अटकेतून निष्पन्न झाला आहे. त्याला पुढील तपासकामी सावदा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अशोक महाजन, युनुस शेख, हवालदार सुनिल दामोदरे, जयंत चौधरी, दिपक पाटील, पोलिस नाईक नंदलाल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, भगवान पाटील, राहुल बैसाणे, चालक पोलिस नाईक मुरलीधर बारी यांनी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment