नाशिक : फसवणूक झाल्याने हातात येणारी जमीनीची रक्कम परस्पर दुस-याने हस्तगत करुन घेतल्याप्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघा फिर्यादी महिलांना 3 लाख 71 हजार 250 रुपयांचा चेक नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्य हस्ते देण्यात आला.
श्रीमती उज्वला प्रकाश बुकाणे व श्रीमती रसिका सुरेश बुकाणे या दोघा महिलांची स्वमालकीची जमीन बंधा-याच्या बांधकामात गेली होती. या जमीनीचा 3 लाख 71 हजार 250 रुपयांचा मोबदला दोघा महिलांना मिळणार होता. मात्र निंबा सयाजी शिंदे याने ती जमीन स्वत:ची असल्याचे भासवून दोघा महिलांना मिळणारी मोबदल्याची रक्कम स्वत: प्राप्त करुन घेतली होती. अशा प्रकारे दोघा महिलांसह शासनाची फसवणूक झाली होती.
या प्रकरणी इगतपुरी पोलिस स्टेशनला निंबा सयाजी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात दोघा महिलांना त्यांची मोबदल्याची रक्कम चेकच्या माध्यमातून प्राप्त करण्यात आली. सदर मोबदल्याचा स्टेट बॅंक ऑफ़ इंडीयाचा चेक पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते दोघा महिलांना देण्यात आला.