औरंगाबाद : पत्नी व तिच्या मित्राने मिळून अनैतिक संबंधात अडथळा ठरणा-या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपाखाली चिकलठाणा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रामचंद्र रमेश जायभाये असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनिषा जायभाये व तिचा मित्र गणेश रघुनाथ फरकाळे असे गुन्हा दाखल झालेल्या दोघा संशयीतांची नावे आहेत. या दोघांवर मनिषाचा पती रामचंद्र जायभाये याची हत्या केल्याचा आरोप आहे. मयताचा लहान भाऊ कृष्णा रमेश जायभाये यांच्या फिर्यादीवरुन सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र याचा मृतदेह पिसादेवी परिसरातील पुलाखाली असलेल्या नाल्यात फेकल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली होती. मयताच्या खिशात मिळून आलेल्या आधार कार्डवरुन रामचंद्र रमेश जायभाये (33), रा. पिसादेवी अशी त्याची ओळख पटली. रामचंद्रच्या मृतदेहावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे.