जळगाव : विनयभंगाच्या गुन्ह्यात मदत करण्याकामी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार केल्याप्रकरणी पोलिस नाईक जळगाव एसीबीच्या तावडीत सापडला आहे. पोलिस नाईक भास्कर नामदेव चव्हाण असे लाचेची मागणी व तिचा स्विकार करणा-या लाचखोराचे नाव आहे.
तक्रारदारासह त्याचे वडील व भाऊ अशा तिघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचे चार्जशीट न्यायालयात लवकर रवाना करण्यासह सर्वतोपरी सहकार्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडे पंधरा हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती.
अमळनेर येथील जुनी पोलिस लाईन परिसरात तक्रारदाराकडून पोलिस नाईक भास्कर चव्हाण यांनी लाचेचा स्विकार करताच एसीबीचा सापळा यशस्वी झाला. जळगाव एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.