पुणे : बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यासह बिल्डरला दीड कोटीचा फ्लॅट, रास्ता पेठ येथे सुमारे तिस कोटी रुपयांची जागा, दोन कोटी सहा लाख रुपयांची खंडणी मागणारा रविंद्र ब-हाटे आता पोलिसांच्या तावडीत आहे. त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने 30 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या गुन्ह्याप्रकरणी यापूर्वी सात जण अटक झालेली आहे. वयोवृद्ध व्यावसायीकाच्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिस स्टेशनला ब-हाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2019 ते 7 जुलै 2020 या कालावधीत कोथरुड परिसरात सदर घटना घडली आहे. ब-हाटे गेल्या कित्येक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता.