गोंदीया (अनमोल पटले) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाचे संशोधक संघर्ष सावळे लिखीत लेख राष्ट्र उभारणी पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात आला आहे. सदर पुस्तिका तामिळनाडू मुक्त विद्यापिठाच्या अंतर्गत कौशल्य विकासाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे.
देशातील विविध अर्थशास्त्रज्ञांचे 41 लेख या पुस्तिकेत प्रसिद्ध करण्यात आले आहेत. संशोधक संघर्ष सावळे यांचा लेख 31 क्रमांकाने प्रसिद्ध करण्यात आला आहे. महिला उद्योजकांच्या कौशल्य विकासांचा प्रस्ताव या शिर्षकाखाली सदर लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखाच्या माध्यमातून संशोधक संघर्ष सावळे यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापिठाच्या नावाची देखील प्रसिद्धी या माध्यमातून झाली आहे.