मुलीच्या अपहरणकर्त्याचे छायाचित्र जारी

On: July 21, 2020 4:34 PM

जळगाव: जयपूरला जाण्यासाठी जलगाव रेल्वे प्लॅटफॉर्मवर गाडीच्या प्रतिक्षे दरम्यान एक परिवार झोपला होता.त्याचा गैरफायदा घेत एका संशयिताने त्या परिवारातील  पाच वर्षाच्या चिमुकलीस खाऊचे आमिष देत तिचे अपहरण केले होते.  16 जून रोजी 2019 घडलेल्या या घटनेतील मुलीस घेवून जाणारा संशयित रेल्वेस्थानक सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

त्याचे सीसीटीव्ही छायाचित्र व रेखाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. संबंधित वर्णनातील संशयित अथवा चिमुकलीबाबत कुणाला काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव एलसीबी ने केले आहे.अपहरण झाले त्यावेळी मुलगी पाच वर्षांची होती. तीची उंची 2 फुट 3 इंच एवढी आहे. तिचा रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपहरण करणार्‍या संशयिताचे फोटो व रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित सुमारे 35 ते 40 या  वयोगटातील असल्याचे दिसून येते. त्याची उंची साधारण 5 ते 6 फुट एवढी आहे. त्याचा रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. फोटोतील चिमुकली अथवा संशयिताबाबत कुणाला काही माहिती मिळाल्यास, समजल्यास त्यांनी ०२५७-२२२१७९० आणि ९८२३०१९७११, ७०२१५०२३५५ या क्रमांकावर कळवण्याचे आवाहन  स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment