पोलिसांना मारहाण करणा-यांचा जामीन नामंजूर

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : जामनेर तालुक्यातील लोणी येथे अतिक्रमण काढत असतांना बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण करणा-या सात जणांचा जामीन न्यायालयाने नामंजुर केला आहे. या घटनेप्रकरणी अटकेतील सात जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अतिक्रमण काढत असतांना बंदोबस्तकामी हजर असलेल्या पोलिसांना मारहाणीचा प्रकार घडला होता. महिला पोलिस कर्मचा-यांचा विनयभंग, दंगल व कट रचणे या कलमांखाली पहुर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अटकेतील संशयित दत्तू उगले, ज्ञानेश्वर उगले, महादू उगले, भास्कर वाघ, पवन उगले, किर्तीराज उगले, सागर उगले यांचा जामीन फेटाळल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here