गावठी पिस्टल बाळगणा-यास अटक

On: October 28, 2021 7:36 PM

जळगाव : जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात गावठी पिस्टल बाळगणा-या तरुणास एलसीबी पथकाने अटक केली आहे. विकी महेंद्र कोळी (समता नगर जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिस नाईक किशोर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. लक्ष्मण अरुण पाटील, पो.ना. रणजीत अशोक जाधव, पो.ना. श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, पो.कॉ. इश्वर पंडीत पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. अटकेतील विकी कोळी याच्या कब्जातून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईकामी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment