संशयास्पदरित्या फिरणा-या तरुणाविरुद्ध कारवाई

On: October 31, 2021 3:08 PM

जळगाव : जळगाव एमआयडीसी परिसरातील अजिंठा चौफुलीनजीक संशयास्पद अवस्थेत फिरणा-या तरुणाला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (20) असे त्याचे नाव असून तो धामणगाव बढे ता. मोताळा जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे.

अटकेतील अंकुश शिवाजी याच्या विरुद्ध भा.द.वि. 379 नुसार कारवाई करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता  3 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. पो.,नि. शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, मिलींद सोनवणे व योगेश बारी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment