पैठणचे तहसीलदार शेळके यांना अटकपूर्व जामीन

On: November 3, 2021 7:45 AM

औरंगाबाद : पैठणचे तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांच्यावर वाळू व्यावसायिकाकडून 1 लाख 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या शेळके यांना औरंगाबाद खंडपीठाच्या सुटीतील न्यायालयाचे न्या. आर. एन. लड्डा यांनी सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 17 नोव्हेंबर रोजी आहे.

सत्र न्यायालयाने शेळके यांचा अटकपूर्व जामीन अगोदर नामंजूर केला होता. अ‍ॅड. राजेंद्र देशमुख यांच्यामार्फत खंडपीठात अर्ज दाखल करण्यात आला होता. महसुल विभागातील अधिकारी कर्मचारी वर्गाचे शेळके यांच्या जामीन निर्णयाकडे लक्ष लागुन होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment