घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक

On: November 3, 2021 7:35 PM

जळगाव : जळगाव शहरातील मासुमवाडीनजीक सैय्यद असरार नगर येथील रहिवासी शेख सलिम शेख रशीद यांच्याकडे झालेल्या घरफोडीचा तपास एमआयडीसी पोलिसांनी लावला आहे. 1 नोव्हेंबरच्या रात्री शेख सलिम हे आपल्या परिवारासह दरवाजा बंद करुन झोपले होते. दुस-या दिवशी सकाळी त्यांना आपल्या घरातील सामान अस्ताव्यसत दिसून आले होते.

मोबाईल, रोख रक्कम , दागिने व इतर वस्तु असा एकुण 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घरातून गायब झालेला होता. याप्रकरणी तपासात पो.नि. प्रताप शिकारे यांना समजलेल्या माहितीच्या आधारे रेकॉर्ड वरील गुन्हेगार वसीम कबीर पटेल (22) रा. नशेमन कॉलनी जळगाव यास रात्रीच चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. तपास पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. रामकृष्ण पाटील, पोलिस नाईक इमरान सैय्यद, पोलिस नाईक योगेश बारी, पो.कॉ. सचिन पाटील, किशोर पाटील, गोवींदा पाटील, सुधीर साळवे व मुकेश पाटील यांनी त्याला बोलते केले.

त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालापैकी सात हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल, 23 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या विविध आकाराच्या दोन अंगठ्या, 8 ग्रँम वजनाचे चांदीचे पेंडल, व पाचशे रुपये किमतीचे पितळी भांडे असा एकुन 30 हजार 500 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.  त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला उद्या 4 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सदर घरफोडीचा गुन्हा तातडीने उघडकीस आणला गेला. अजुन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवल्ली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment