चोरट्यांचा पाठलाग करतांना पोलिस अधिकारी मृत्युमुखी

On: November 10, 2021 8:56 AM

लातुर : घरफोडीतील चोरट्याच्या पाठलाग करत असतांना पोलिस उप – निरीक्षकाचे हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. आज सकाळी तिन वाजेच्या सुमारास लातुर येथे घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत अहमदखान पठाण असे मृत्युमुखी पडलेल्या पोलिस उप निरीक्षकाचे नाव आहे.

लातुर येथील लक्ष्मी कॉलनी भागातील एका घरात चोरटे घरफोडी करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे वाहन घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याची माहिती मिळताच तिघे चोरटे मागच्या दरवाजाने पलायन करु लागले. पीएसआय अहमद खान पठाण यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. मात्र अचानक ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिका-यांनी त्यांना मृत घोषीत केले. शिवाजी नगर पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अहमदखान पठाण यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment