गळफास घेत शेतक-याची आत्महत्या

On: November 9, 2021 4:15 PM

जळगाव : तालुक्यातील बिलखेडा येथील शेतकरी माधवराव श्रावण कुंभार (62) यांनी आपल्या राहत्या घरी बिलखेडा येथे गळफास घेत आत्महत्या केली आहे. आज दुपारी सव्वा दोन वाजता उघडकीस आलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिस पाटील मुकुंदा पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. सहायक फौजदार राजेंद्र उगले, पो.कॉ. अनिल पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. उत्तरीय तपासणीकामी मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. माधवराव कुंभार यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment