सेवानिवृत्त पोलिस अधिक्षकांची कोट्ट्यावधीत फसवणूक

On: November 10, 2021 10:10 AM

औरंगाबाद : कागदपत्रात फेरबदल करुन सह्या घेत कोट्यावधीची रक्कम परस्पर उचलणा-यांविरुद्ध सेवानिवृत्त पोलिस अधिक्षकाने गुन्हा दाखल केला आहे. हिरासिंग भिसुजी जाधव असे फिर्यादी सेवानिवृत्त पोलिस अधिक्षकाचे नाव आहे. उत्तम भिसुजी जाधव (महागाव यवतमाळ), कमलाबाई उत्तम जाधव, नितीन उत्तम जाधव, अ‍ॅड रमेश काशिनाथ पाटील व छाया प्रशांत देशमुख (पुसद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.

भोसा आणि तिवरंगा या दोन गावात हिरासिंग जाधव यांचे वडिलोपार्जित घर आणि शेतजमीन आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या नागपूर-तुळजापूर या प्रकल्पात त्यांच्या शेतजमिनीचा भाग मोठ्या प्रमाणात गेला. या जमीनीचा मोबदला म्हणून 2 कोटी 11 लाख 32 हजार 764 रुपये त्यांना मिळणार होते. मात्र संशयीतांनी बनावट कागदपत्रे तयार करुन हिरासिंग जाधव यांच्याकडून सह्या घेत रक्कम परस्पर हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे. नितीन जाधव हा संशयीत पोलिस दलात सेवेत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment