अमरावती (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): अक्षय आणि अनामिका (दोन्ही नावे काल्पनिक) दोघे मित्र होते. अक्षय या तरुणासोबत अनामिकाची ओळख सन 2014 मधे अमरावतीत झाली. त्यानंतर हळूच ओळखीचे रुपांतर सहवासात झाले. या सहवासातुन दोघांमधे प्रेमाचा अंकुर फुलला. हा प्रेमाचा अंकुर कळीत व नंतर फुलात होण्यास वेळ लागला नाही. दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले. प्रेमाच्या भेटीगाठी देखील सुरु झाल्या. दोघांच्या प्रेमाची गाठ नंतर सुटता सुटेना. दरम्यान अक्षयचे शिक्षण पुर्ण झाले. पदवीचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर त्याला नोकरीनिमीत्त अमेरीकेत जाण्याची संधी मिळाली.
अनामिकासोबत प्रेम जडल्यानंतर एका वर्षातच अमेरिकेत जाण्याची संधी मिळाल्याने अक्षय भलताच खुशीत होता. सन 2015 मधे अक्षय पुन्हा अमरावतीला आला. अमरावतीला आल्यानंतर त्याने अनामिकासोबत लग्न करण्याची तयारी दर्शवली. मात्र तिला अमेरीकेत जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे तिने त्याच्यासोबत लग्न करण्यास नकार दिला. लग्नास नकार दिला तरी दोघातील प्रेमाचे संबंध कायम होते. दोघे एकमेकांच्या बाहुपाशात विसावत होते. एकमेकांसोबत नको त्या अवस्थेत दोघांनी फोटोशुट करण्याचा कार्यक्रम केला. दोघांच्या प्रणयाचा व्हिडीओ अक्षयने तयार केला. गोड बोलून त्याने तिच्या मोबाईलमधील डाटा आपल्या मोबाईलमधे ट्रान्सफर करुन घेतला. त्यामधे अनामिकाचे खासगी क्षणाचे फोटो व माहिती होती.
त्यानंतर या व्हिडीओच्या बळावर त्याने तिला आपल्या तालावर नाचवण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघात वाद सुरु झाले. त्यानंतर तो पुन्हा अमेरीकेत निघून गेला. अक्षय अमेरीकेत निघून गेल्यानंतर इकडे तिच्या पालकांनी तिच्यासाठी वर संशोधनाचा कार्यक्रम सुरु केला. लवकरच अनामिकाचा विवाह एका सुस्वरुप तरुणासोबत झाला. दोघे अमरावतीत सुखाने राहू लागले. अनामिका व अक्षय यांच्यातील लग्नापुर्वीच्या संबंधाची तिच्य पतीला काहीच खबर नव्हती. लग्नानंतर करण्याचा कार्यक्रम अनामिकाने अक्षयसोबत लग्नापुर्वीच करुन ठेवला होता.
सन 2016 मधे अनामिकाच्या एका महिला नातेवाईकाच्या मोबाईलवर अक्षयने तिचे खासगी फोटो पाठवले. येथून दोघांचे संबंध बिघडण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. अनामिका आता एक विवाहिता होती. मागचा इतिहास पुढे आणण्याची अक्षयला काही आवश्यकता नव्हती. मात्र तिचे खासगी फोटो व्हायरल करण्याची तो तिला धमकी देऊ लागला. त्याच्या या त्रासाला वैतागून अनामिकाने पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्याची त्याला धमकी दिली. त्यामुळे त्याने तयार केलेले फेक फेसबुक अकाऊंट डिलीट केले. मात्र त्यानंतर देखील त्याने तिची बदनामी सुरुच ठेवली. तिच्या नातेवाईकांसह मित्रांना दोघांचे खासगी फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यास त्याने सुरुवात केली.
त्यानंतर मात्र त्याचे धाडस वाढले. त्याने तिच्या पतीला 17 ऑक्टोबर 2021 रोजी एक मेल केला. त्या मेलवर त्याने दोघांचे खासगी फोटो व व्हिडीओ अपलोड केले. आपल्या पत्नीचे अक्षयसोबत असलेले खासगी फोटो बघून तो हादरला. आपल्या पतीपर्यंत हा प्रकार गेल्याने अनामिका देखील हादरली. तिने फ्रेझरपुरा पोलिस स्टेशन गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार अमरावतीचा मुळ राहणारा व सध्या टेक्सास – अमेरिकेत मुक्कामी असलेल्या अक्षय विरुद्ध गुन्हा दाखल केला. बलात्कार, विनयभंग, बदनामी करणे, धमकी देणे यासह माहिती व तंत्रज्ञान कलमानुसार सदर गुन्हा नोंद करण्यात आला. फ्रेझरपुरा पोलिस पुढील तपास करत आहेत.