पोलिस भरतीत डमी उमेदवार बसवणा-यांचे रॅकेट?

On: November 16, 2021 8:39 AM

पुणे : मुंबई पोलिस शिपाई पदाच्या लेखी परीक्षेत पुणे येथील डमी विद्यार्थी बसवणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. सज्जन कपूरसिंग गुसिंगे (28) कौचलवाडी ता. अंबड जिल्हा जालना असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद, जालना भागात पोलिस भरतीच्या परिक्षेत डमी विद्यार्थी बसवण्याचे रॅकेट सक्रीय असल्याचे म्हटले जात आहे. या कामात पाच लाख रुपयांपासून व्यवहार होत असल्याचे देखील म्हटले जाते. स्वारगेट पोलिस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment