गावठी पिस्टलसह तरुणास अटक

On: November 16, 2021 7:53 PM

जळगाव : विनापरवाना गावठी पिस्टल बाळगत दहशत माजवणा-या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळ शहरातून अटक केली आहे. खुशाल गजानन बोरसे (25) खडका रोड रामदास वाडी भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. भुसावळ शहरातील चितोडे वाणी मंगल कार्यालय परिसरातून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कब्जातून एक गावठी बनावटीचे बेकायदा पिस्टल हस्तगत करण्यात आली आहे.

त्याच्या विरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. जालिंदर पळे, सहायक फौजदार अशोक महाजन, हे.कॉ. लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, पोलिस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो.कॉ. विनोद पाटील, इश्वर पाटील, चालक विजय चौधरी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment