सुप्रीम कोर्टाने फटकारले योगी सरकारला
खुनासह ६५ फौजदारी खटले असूनही विकास दुबे जामिन अथवा पॅरोलवर बाहेर कसा आला? याचा तपास सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान हे करणार आहेत. असे गुंड इतकी वर्ष तुरूंगातून बाहेर असल्यामुळे “भितीदायक” असल्याचे सांगितले गेल्या सुनावणीत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी उत्तर प्रदेश सरकारला सांगितले होते.
उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याचा पोलिसांच्या ताब्यातून पळतांना झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता. त्याने केलेल्या आठ पोलिसांच्या हत्येची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांत अहवाल मागवला आहे.
सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, “दुबे यास जामिनावर सोडणे हा चौकशीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच या सर्व परिणामांना सामोरे जावे लागत आहे.