जळगाव : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या जबर धडकेत रिक्षा दोन्ही बाजुने दाबली जावून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना आज जळगाव येथे घडली. जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर शिव कॉलनी नजीक घडलेल्या या विचित्र अपघाताने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुढे आला आहे.
ट्रॅक्टरच्या धडकेत रिक्षाचे (एमएच – 19 व्ही 3441) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने प्राणहानी झाली नाही. रिक्षाचालक रिक्षात नसल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहे. मात्र आपल्या रिक्षाचे नुकसान झाल्याचा जाब विचारण्याआधीच विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर चालकाने भीतीपोटी घटना स्थळावरुन पलायन केले. त्यामुळे तो देखील पब्लिक मारापासून बचावला.