पुणे : पुणे येथील प्रसिध्द शासकीय रुग्णालयातील स्टाफ नर्स ती वास्तव्यास असलेल्या गेस्ट हाऊसच्या बाथरुम मधे गेली असतांना तिचे लपून चित्रीकरण करणा-या सुरक्षा रक्षकास बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. अशोक तुकाराम चव्हाण असे अटक करण्यात आलेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
पोलिस तपासात व सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. 22 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी नर्सच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी नर्सची ड्युटी कोरोना वार्डात व मुक्काम गेस्ट हाऊस मध्ये आहे. कोरोना वार्डातील कामकाज आटोपून आल्यानंतर सदर नर्स स्नान करण्यासाठी बाथरुममधे गेली. त्यावेळी नर्सला काहीतरी गडबड असल्याची शंका आली. तक्रारीनंतर तपासाअंती या गुन्ह्यात सुरक्षरक्षकाचा सहभाग आढळून आला. सुरक्षा रक्षक चव्हाण हा महाराष्ट्र सुरक्षा बलाचा कर्मचारी आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.