जळगाव : अवैध गावठी दारु निर्मिती – विक्रीमुळे होणा-या दुष्परिणामाबाबत जळगाव तालुक्यातील वावडदा येथील ग्रामस्थ महिला एकवटल्या. सर्व महिला एकत्र आल्याने ग्रामपंचायतीत गावात दारु बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.
या प्रसंगी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या आदेशाने म्हसावद दुरक्षेत्रचे कर्मचारी हजर होते.