जळगाव : अनोळखी इसमाने विचारलेला पत्ता सांगण्यासाठी थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटारसायकलवरील दोघा चोरट्यांनी हिसकावत पलायन केले होते. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासाअंती सदर महिलेचे 22 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र चोरट्यांकडून हस्तगत करण्यात आले. ते मंगळसुत्र संबंधित महिलेस परत करण्यात आले आहे.