जळगाव : जळगाव शहरात ट्रॅक्टर व डंपरच्या धडकेने होणाऱ्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दररोज अशा अपघातांच्या घटनांमागे जळगाव शहरातील रस्ते देखील कारणीभूत असल्याची ओरड वर्षानुवर्ष सुरुच आहे.
आज पहाटे भोकर कडे जाणा-या कारला (एमएच 14 एफसी 4550) ट्रॅक्टरने धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन जण ठार व दोघे जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. कार मधे भादली येथील पाटील कुटुंब भोकरला जात होते. अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.