घरफोडीतील दोघे मुद्देमालासह अटक

On: November 25, 2021 9:56 PM

जळगाव : जळगाव शहरातील गणपती नगर परिसरातील बंद घरातून वस्तूंची चोरी करणा-या दोघा घरफोडयांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. फरीद महंमद मुलतानी (अजमेरी गल्ली तांबापुरा जळगाव) आणि श्याम सुभाष तानसर (रामेश्वर कॉलनी- संभाजी नगर जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

अटकेतील दोघांकडून दोन गॅस सिलेंडर, टीव्ही आणि पाण्याची मोटार हस्तगत करण्यात आली आहे. पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रवी नरवाडे, युनुस शेख, हे.कॉ. राजेश मेंढे, संदीप पाटील, पोलीस नाईक संतोष मायकल आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment