जळगाव पोलिस दलातर्फे शहिदांना मानवंदना व संविधानाचे वाचन

On: November 26, 2021 5:45 PM

जळगाव : आजच्या तारखेला 26 – 11 रोजी मुंबई येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या भ्याड हल्याचा निकराने लढा देत जीवाची बाजी लावत एका दहशतवाद्यास जिवंत पकडण्यात आले होते.

या भ्याड हल्ल्यात प्राण पणाला लावत मुंबई, महाराष्ट्र पोलीस आणि भारतीय सैन्यातील जवान धारतीर्थी पडले. त्यां जवानांच्या स्मृतींना उजाळा देवून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेला आज जळगाव पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या उपस्थितीत मानवंदना देण्यात आली.

याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपस्थीत सर्व अधिकारी, अंमलदार, कार्यालयीन अधिकारी व कर्मचा-यांनी पुष्पचक्र व फुले अर्पण करत त्यांना मानवंदना दिली. तसेच आज संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान वाचन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment