जळगाव : जळगाव जिल्हा कर्मचारी भविष्य निधी संगठन जिल्हा कार्यालय यांच्यातर्फे (ता.25) ला जैन हिल्स येथे ई-नोमिनेशन व ई पी एफ ओ चे नवीन उपक्रमाबाबत शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबीरामध्ये ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ संबंधित नवनवीन घडामोडींविषयी चर्चा करण्यात आली.
जैन हिल्स येथे झालेल्या सेमिनारला सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीचे सदस्य प्रभाकर बाणासुरे, भारत सरकारचे श्रम एवं रोजगार मंत्रालयचे, क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग एक नासिकचे अनिल कुमार प्रीतम , क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त वर्ग दोन नासिकचे डॉ . राम कृष्ण त्रिपाठी व शुभम कश्यप , सहाय्यक भविष्य निधि आयुक्त , जिल्हा कार्यालय , जळगाव हे उपस्थित होते.
प्रभाकर बाणासुरे यांनी ई – नोमिनेशन चे महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावुन सांगितले तसेच जिल्हा कार्यालय, जळगावचे क्षेत्रीय कार्यालय म्हणून रूपांतरित होणेसाठी केंद्रीय श्रम मंत्री भुपेंद्र यादव यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे उपस्थितांना आश्वासन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणात क्षेत्रीय भविष्य निधि आयुक्त अनिल कुमार प्रीतम , यांनी ई – नोमिनेशन बद्दलचे विस्तृत विवेचन , महत्व व ई पी एफ ओ चे नवनवीन घडामोडी उपस्थितांना समजावून सांगितले व उपस्थितीत आस्थापनांचे प्रतिनिधि यांच्या प्रश्नाला उत्तरे दिलीत व शंका समाधान केले तसेच त्यांनी जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे विशेष आभार व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुभाग पर्यवेक्षक रविंद्र मराठे यांनी केले .सहाय्यक भविष्य निधि आयुक्त शुभम कश्यप यांनी आभार मानले.