जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक चालवत चालकाच्या वेशात कन्नड घाटात जाऊन केलेल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.
अवजड वाहनांना बंदी नसतांना कन्नड घाटात नाकाबंदी करत प्रत्येक ट्रक चालकांकडून 100, 300, 500 रुपये जशी जमेल तशी वसुली करणा-या जमाकर्त्या पोलिस कर्मचा-यांचा पर्दाफाश आ. मंगेश चव्हाण यांनी केला होता.
नाकाबंदीच्या नावाखाली ट्रक चालकांकडून वसुली करणारे हे.कॉ. गणेश वसंत पाटील, प्रकाश भगवान ठाकुर, पो.कॉ.सतिष नरसिंग राजपुत, संदीप भरत पाटील यांना कसुरवार ठरवण्यात आले आहे. या चौघांना पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निलंबित केले असून त्यांची खात्याअंतर्गत चौकशी सुरु करण्यात आली आहे. निलंबन काळात चौघे कर्मचारी खासगी नोकरी, व्यवसाय करु शकणार नाहीत.