रमी जुगार खेळणा-या पोलिसांना दत्ता शिंदे यांचा इशारा

On: November 28, 2021 12:34 PM

पालघर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी रमी जुगार खेळणाऱ्या पोलिसांना इशारा दिला आहे. मोबाईलमधे रमी जुगाराचे अँप असल्यास ते विनाविलंब काढून टाकण्यास त्यांनी बजावले आहे.

आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणारे पोलिसच जर ऑनलाईन रमी खेळत असतील आणि पोलिस दलाच्या प्रतीमेस धक्का लावत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाईचा इशारा पालघर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी दिला आहे. सदर अँप मोबाईल मध्ये असल्यास ते विनाविलंब डिलीट करण्याबाबतचे आवाहन एका परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केले आहे.

पालघर जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमधे ऑनलाईन रमी अँप आहे काय? याची पडताळणी करण्याच्या सूचना त्यांनी विभागातील वरिष्ठ अधिकारी वर्गाला दिले आहे. सदर अँप असल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे योग्य रीतीने समुपदेशन करण्यास त्यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment