महिलांना मारहाण – सहायक पोलिस निरीक्षक निलंबित?

On: November 30, 2021 6:50 AM

वसई : चोर समजून सहा आदिवासी महिलांना करण्यात आलेल्या मारहाणप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकाचे निलंबन करण्यात आले असल्याचे म्हटले जात असून खात्या अंतर्गत चौकशी केली जाणार असल्याचे देखील म्हटले जात आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी चोर समजून काही आदिवासी महिलांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले होते. या महिलांना दोष नसतांना मारहाण झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोडून देण्यात आले होते असे म्हटले जात आहे. या महिलांना ताब्यात घेतल्याची नोंद घेण्यात आली नव्हती असे आदिवसी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस निरीक्षक विनोद वाघ यांचे निलंबन झाल्याचे म्हटले जात आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला असता महिलांना मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment