अहमदनगर : पोलिस उपनिरीक्षकाला जबर मारहाण करत खिशातील सतरा हजाराची रक्कम काढून घेतल्या प्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनला नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील फुंदे टाकळी ता.पाथर्डी येथील रहिवासी पोलीस उप निरीक्षक संदीप भगवान फुंदे मुंबई पोलिस दलात कार्यरत आहेत. फुंदे सुटीवर गावी आले होते. रविवारी दुपारीपाथर्डी शहरात एका मेडिकल दुकानासमोर ते आपल्या ताब्यातील चार चाकी रस्त्याच्या बाजूला उभी करत होते. दरम्यान त्यांच्या मागे असलेल्या वाहनाला त्यांच्या वाहनाचा धक्का लागला. या कारणावरुन नऊ जणांनी पीएसआय फुंदे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. तसेच त्यांच्या खिशातील सतरा हजार रुपये जबरीने काढून घेतले. हिसकावून घेतली.
या प्रकरणी फुंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलीस स्टेशनला नामदेव कोंडीराम केळगंद्रे, प्रकाश नामदेव केळगंद्रे , सचिन गोरख केळगंद्रे, अक्षय ज्ञानदेव केळगंद्रे, राहुल बापुराव त्र्यंबके , लतीफ शेख व अनोळखी तीन या सर्व जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .







