परमबीर सिंग यांच्या निलंबन प्रक्रियेला वेग

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या निलंबनाबाबत हालचाली सुरु असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांची भेट अत्यंत चुकीची असून न्यायालयाची परवानगी नसताना ही भेट झाली आहे. या भेटीसंदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली आहे.

परमबीर सिंग मुंबईत परत आल्याबाबत सरकारला कळवले नसून त्यांनी होमगार्डच्या महासंचालक पदाचा पदभार देखील घेतलेला नाही. परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते. फरार घोषित असले तरी त्यांना शासकीय गाडीसह इतर शासकीय सुविधा कशा काय देण्यात आल्या याबाबतची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. परमबीर सिंग सरकारी वाहनाचा वापर करत असून ते चुकीचे आहे. ते यावेळी कामावर नसून त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. याबाबत देखील चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here