सहायक फौजदाराविरुद्ध खोटे प्रमाणपत्र प्रकरणी गुन्हा

पुणे : स्पोर्टसच्या खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाविरोधात चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश नवनाथ करांडे (बीड) असे गुन्हा नोंद झालेल्या सहाय्यक फौजदाराचे नाव आहे. अप्पर पोलीस महासंचालक (दळणवळण व परीवहन) कार्यालयातील मुख्य लिपिक किरण सोनार या प्रकरणी तक्रारदार आहेत.

दिनेश करांडे यांनी सन 2015 -16 या कालावधीत सहाय्यक फौजदार रेडीओ यांत्रिकी (गट क) या पदाच्या भरतीसाठी तीन प्रमाणपत्र सादर केली आहेत. महाराष्ट्र राज्य शूटिग बॉल अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धेतील औरंगाबाद जिल्हाकडून खेळलेले प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्पर्धेत बीड विभागाकडून खेळण्यात आलेले तृतीय क्रमांकाचे प्रमाणपत्रांचा यात समावेश आहे.

नोकरीसाठी सादर केलेली तिन्ही प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब पुढे आली आहे. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दिनेश करांडे यांच्याविरुद्ध चतुशृंगी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here