राज्यातील नऊ उप – प्रादेशिक परिवहन कार्यालयांचे प्रादेशिक कार्यालय करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्याबाबतीत प्रक्रिया सुरु झाली आहे. याकामी नव्याने बारा प्रादेशिक परिवहन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.
राज्यात आजच्या घडीला पंधरा प्रादेशिक परिवहन अर्थात आरटीओ कार्यालये आहेत. या कार्यालयांसह परिवहन आयुक्त कार्यालयात सोळा प्रादेशिक परिवहन अधिका-यांची पदे मंजूर आहेत. आठ अधिकारी सध्या विविध कार्यालयात नेमणुकीला असून आठ अधिका-यांची पदे रिक्त आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. राज्यात पिंपरी चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, पालघर, चंद्रपूर, अकोला, बोरीवली, सातारा या नऊ उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा कामाचा आणि महसुलाच्या व्याप लक्षात घेता याठिकाणी नवीन प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा प्रस्ताव आहे. प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची पदे सोळा वरून 28 करण्याचा देखील प्रस्ताव आहे. परिवहन खात्याच्या वरिष्ठ पातळीवरील समितीची याकामी मंजुरी देखील मिळाली आहे.