जळगाव : आज सकाळी सावदा नजीक पिंपरुड फाट्याजवळ फॉर्च्युनर – इंडिका यांच्यातील अपघातात महिलेचा मृत्यू झाला असून इतर जखमी झाले आहेत. मोठे वाघोदे येथील प्रगतीशील शेतकरी भरत सुपे यांच्या पत्नी भावना भरत सुपे असे अपघाती निधन झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे वाघोदा व सावदा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
फॉर्च्युनर कार (डीएल 10 इ 6165) व इंडिका (एमएच 19 एपी 2612) अशी अपघातग्रस्त वाहने आहेत. भरत सुपे यांच्या मुलाच्या लग्नाच्या स्वागत समारंभाच्या खरेदीनिमित्त सुपे परिवारातील सदस्य जळगावला येत असतांना हा अपघात झाला.