महिला पीएसआयसह सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात

पिंपरी – बलात्काराचा गुन्हा दाखल होण्यापासून तक्रारदाराचा बचाव करण्यासाठी त्याच्याकडून तडजोडीअंती सत्तर हजार रुपयांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी सहायक फौजदारासह महिला पोलिस उपनिरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई दरम्यान सहायक फौजदार एसीबीच्या पथकाला धक्का मारुन पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

पोलिस उपनिरीक्षक हेमा सिध्दराम सोळुंके (28) , सहाय्यक फौजदार अशोक बाळकृष्‍ण देसाई अशी लाच प्रकरणातील दोघांची नावे आहेत. दोघे लाचखोर सांगवी पोलिस स्टेशनला कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here