रस्ता अपघातात इसमाचा मृत्यु

On: December 3, 2021 11:21 AM

जळगाव : रस्ता अपघातात इसमाचा मृत्यु झाल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. भिकन महाजन असे मयत इसमाचे नाव असून तो टाकरखेडा येथील रहिवासी असल्याचे समजते.

शिरसोली रस्त्यावरील आर के ढाबा परिसरात सदर इसमास कोणत्या तरी वाहनाची धडक लागल्याने तो जखमी अवस्थेत पडून होता. त्यास संतांजी लाडवंजारी यांनी सामान्य रुग्णालयात रात्रीच्या वेळी दाखल केले. उपचारादरम्यान सदर भिकन महाजन या इसमाचा मृत्यू झाला. पुढील कायदेशीर तरतुदींची तजवीज पोलिस नाईक महेंद्र गायकवाड करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment