जळगाव : पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या विशेष पथकाने गावठी कट्टा, काडतुस बाळगणा-या आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेत अटक केली आहे. गुरजितसिंह अकबरसिंह बर्नाला (36),रा.उमर्टी ता.वरला जि.बडवानी (मध्य प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुढील तापासकामी त्याला चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पो.नि.बापू रोहम, सहायक फौजदार, बशिर तडवी, हे.कॉ. रामचंद्र बोरसे, पोलिस नाईक मनोज दुसाने आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गु.र.न. 215/2021 आर्म अँक्ट 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा (₹ 30000/-)रु., एक मँगजीन (₹2000 /-) असा एकुण ₹32000/ चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.